whats app status, facebook status, fb status

शब्दांची - किमया

 शब्दांची - किमया (१)

------------

मित्रांनो संपूर्ण वाचा ! 
 लग्नंघर..... ! 
मी हे वधूपक्षाच्या लग्नंघराबद्दल म्हणतोय.…बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी येतात. थकवा ओसरला की निघायच्या दृष्टीने रिटायर्ड लोकांनी दोनचार दिवसानंतरची जायची रिझर्वेशंस केलेली असतात.…. !मागे राहिलेले दहाबारा पाहुणे, घरभर अस्ताव्यस्तं पडलेलं सामान, रंगीबेरंगी कागदात गुंडाळलेली प्रेझेंटस, बाहेर लावलेल्या लाईटच्या माळांचा निस्तेज प्रकाश, प्रत्येकाच्या चेह-यावर मानसिक आणि शारीरिक थकव्याचा हलकासा पफ फिरवल्यासारखा थर, कुणालाही भूक नसते पण दुपारीच जेवण झाल्यावर परतलेली, कमी दमलेली एखादी अनुभवी वयस्कं आत्या, काकी मुगाच्या डाळीची खिचडी ग्यासवर चढवते, 'पोह्याचे पापड कुठेत गं? सांग फक्तं, मी काढते ' विचारत तिच्या दृष्टीने नुसत्याच मिरवणा-या पाहुण्या मुलीला/ सुनेला 'ताक घुसळतेस पटकन?' अशी आदेशवजा विनवणी करते. सुनेला त्रास न देता सापडल्याच तर दहाबारा सांडगी मिरच्या तळून ठेवते.…. ! उद्या सकाळीजाणारे पाहुणे आपापलं सामान गोळा करतात, सकाळी घालायचे कपडे, रिझर्वेशंस वरती काढून ठेवून टूथब्रश सकाळी सापडेल अशा नेमक्या जागी ठेवतात. आजीच्या चेह-यावर लग्नाकरता एवढ्या लांबून मुद्दाम आलेल्या माणसाबद्दलचं कौतुक ओसंडून वहात असतं. परत भेट होतीये न होतीये म्हणून ती मायेने चिवडा लाडूच्या दोन पुड्या त्यांच्या हातात कोंबते. गाड्यांचे, कुणीकुणी गेल्या दोन दिवसात खर्च केलेले पैसे आठवणीने दिले जातात. सुतकात असल्यासारखे सगळेजण ऊनऊन खिचडीचे दोन घास पोटात घालतात, लग्नंकसं झालं, फोटो, दागिने यावर हलक्या आवाजात निरुत्साही चर्चा होते. अशावेळी सगळं पटापट आवरलं जातं. बापाचा हात न वाजलेल्या फोनकडे सारखा जातो. एकदाचा उत्साहानी फसफसलेला, आनंदी फोन येतो, सगळा ताण रिलीज झाल्यासारखा बाप 'मिरची फारच तिखट आहे'म्हणत तांब्यानी वरून पाणी पित डोळ्यातलं मागे सारतो.…. ! नमस्कार होतात, ओट्याभरल्या जातात, दिलं घेतलं जातं. आठवणी निघतात. डोळे ओले होतात, पुसले जातात, तोंडभरून आशिर्वाद मिळतात, दिले जातात, कानशिलावर बोटं मोडली जातात, परत लवकरच भेटण्याचे वायदे होतात, नातवंडांचे, माहेरवाशीणीचे गाल आजीच्या पाप्यांनी ओलसर होतात. दोनतीन दिवसात सुगी संपल्यावर पाखरं नाहीशी होतात तसा एकेक पाहुणा परततो.मग उरतो तो फक्तं नि:शब्द एकांत. मग आजी शहाण्यासारखी कोचावर सुखानी लवंडते.….! शेवटच्या पाहुण्याला स्टेशनवर सोडून आलेला बाप 'मला भूक नाहीये गं, पडतो जरा' म्हणत बेडरूममधे जातो. मुलीचं कपाट उघडतो, घरी आल्यावर लागतील म्हणून तिनी ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवतो. लागूनच असलेल्या बेडवर बसतो आणि ओंजळीत तोंड धरून आवाज न करता धबधब्यासारखा फुटतो.……… !मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको आई होते आणि त्या फक्तं वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरते.…. ! लेख - watsup वाचनालयलक्षात ठेवा -बाप हा सावली देणाऱ्या वृक्षा सारखा असतो आणि कोणताही वृक्ष आपल्या फळा कडून कसलीही अपेक्षा कधीच ठेवत नाही. तो फक्त त्या फळाला वाढवून सर्वाधिक गोड कसे बनवता येईल या साठीच जगात असतोतात्पर्य -बायांनो हा लेख वाचून नुसते डोळे पुसू नका तर ! तर आपल्या संसारिक व्यापातून वेळकाढून दिवसातून एकदा तरी आपल्या म्हातार्या बापाची चौकशी करण्या साठी एक तरी फोनकरत जा ! कारण ३६५ दिसव रोज तो आपल्या मुलीची मनातल्या मनात आठवण काढत असतो हे विसरू नका. कारण एकदा तो बाप या जगातून गेला कि या संपूर्ण पृथ्वी वर तुमची मायेने आठवण काढणारा असा कोणी उरणार नाही. जीवन खूप छोटे आहे सूचना -प्रेमाच्या नावाखाली आपल्या बापाच्या हृदयाला छेद देऊन तोंड काळ करणाऱ्या मुलींनी सुद्धा हा लेख वाचावा व आपण तोंड काळ केल्या नंतर आपल्या बापाची काय अवस्था होते हे यातून जाणून घ्यावे ! बापाने वरून कितीही शिव्या दिल्या तरी तो बाप रोज रात्री आपल्या मुली साठी रडत असतो हे विसरून चालणार नाही तर मग उचला तुमचा फोन आणि लगेच बोला आपल्या वडिलांशी तरच हा लेख सफल झाला असे म्हणता येईल.......! 

*----------------------------------------*

असे जगावे....

असे जगावे दुनियेमध्ये
आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची
भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही
चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची
मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती
कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती
काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे
आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर
करुन जावे असेही काही
दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या
निरोप शेवटचा देताना
स्वर कठोर त्या काळाचाही
क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर


*----------------------------------------*

 🙏काळजाचा तुकडा🙏

लाडात वाढलेली लेकमांडवात उभी पाहुन
हसर्या चेहर्यानं बापमुसमुसत होता राहुन राहुन // धृ//
कोपर्यात उभा बाप अक्षता टाकत होता 

घाम पुसायच्या निमित्ताने डोळे पुसत होता //1//
काळजाच्या तुकड्याला पाहुन आतुन तुटत होता 

" पोरीचं चांगलं झालं "
हसुन म्हणत होता //2//
   अश्रुंचा बांध त्यानं अडवुन धरला होता डोळयासमोरुन लेकिचा चेहरा
   दुर होत नव्हता //3//
लग्न लागल्यावर सारेच टाळ्या वाजवत होते एक तोच मात्र
   आसवांमध्ये भिजत होता //4//
लहानमोठ्यांना तो हात जोडत होत " लेकिला जीव लावा माझ्या "
डोळे भरून सांगत होता //5//
सायंकाळी सारे पाहुणे खिचडीभात खात होते बापाचा हात न वाजणार्या
  फोनकडे जात होता //6//
लेकिचा फोन येताच " मिरची तिखट आहे " म्हणत
तांब्यानं पाणी पित होता अन डोळयातलं आसव मागं सारत होता....

सुगी संपल्यावर पाखरांसारखा एकेक पाहुणा परतत होता शेवटच्या पाहुण्याला पोहचवुन " मला भुक नाही "अस बाप म्हणत होता //8//
बेडरूममधील लेकीचं कपाट हळुच बाप उघडत होता तिने ठेवलेल्या कपड्यांवरून थरथरता हात फिरवत होता //9//
तिथच बेडवर बसुन ओंजळीत तोंड धरून बाप आवाज न करणार्या
धबधब्यासारखा फुटत होता//10//
मांजरीच्या पावलांनी पाठोपाठ आलेली मनकवडी बायको "आई" होत होती
वय वाढलेल्या सशाला छातीशी घट्ट धरून काळजाच्या तुकड्याला आठवुन
 आसवांमध्ये भिजत होती.. //11//
    हे अस नात वडील आणि मुलगी... म्हणून म्हणतो एक तरी लेक असावी.
डोळ्यातील प्रत्येक थेंबात दिसणारी..
✍🏻✍🏻✍🏻
" Save Girl Save Child"


*----------------------------------------*

✨✨✨
जेव्हा फुटत होती प्लेट
बालपणी तुमच्या कडुन
आता आई कडुन फुटली
तर तिला काहीही बोलु नका
       
     जेव्हा मागत होते फुगा
     लहानपणी आई जवळ
    आता आई चष्मा मागते
    तर तिला नाही म्हणु नका तुम्ही

जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आई जवळ
आता आई औषध मागते
तिला आणायला विसरु नका तुम्ही     

     आई रागवत होती तुम्हाला
     जेव्हा मस्ती करीत होत तुम्ही
     आता तिला ऐकु येत नाही
     तर तिला रागावु नका तुम्ही

जेव्हा चालत नव्हते तुम्ही
आई बोट धरुन चालवत होती
आता ती चालु शकत नाही
तर तिचा हात पकडुन सहारा द्या तुम्ही
         
         जेव्हा रडत होते तुम्ही
         आई छातीला लावत होती
         आता सहन करा दु:ख तुम्ही
          तिला रडु देवु नका तुम्ही

जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्या जवळ नक्की थांबा तुम्ही.....

 आयुष्यात खुप अडचणी येतील पण त्याच्यासाठी जगा...  जे
तुमच्यासाठी स्वत:चा जिव अर्पण
करतात...
✨✨✨


 *----------------------------------------*

आपल्याला पण एक मैत्रिण असावी!
समोरआलॊ की थोडीशी हड्बडावी , बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी , चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी , घर जवळ येताच पुढे निघून जावी , आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी , दिसलो की गालावर छान खळी पडावी , कधी हसता हसताच ती रडावी , कधी रडता रडताच खुद्कन हसावी , हक्काने आपल्यावर रागवावी , मग काही  न बोलताच निघून जावी , नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी , सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी , निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी , ती आनंदातअसली की घडघडुन बोलावी नाहीतर थोडीशी अबॊल रहावी , सुखात सगळ्यांना सामिल करावी , व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी , बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी , आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी , परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी "साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी थोडा वेळ मग ती शांत रहावी पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी ती बरोबर असली की आधार वाटावी , आपल्याला पण एक मैत्रिण असावी....!

*----------------------------------------*

अरे विचार काय करतोस काहीतरी करुन दाखव
वेळ जाईल निघुन प्रवाहामध्ये तरुन दाखव...
.लाखो आले अन गेले बोलघेवडे सगळे स्वतः काही नाही केले
फक्त लोकांना उपदेश दिले...उपदेशाच कडु तु पिउन तर बघ
सत्याची कास धरुन तर बघ कुणीतरी आपल्या भल्याच सांगत
एखाद्यावर विश्वास ठेऊन तर बघ...यश आयल्याच हातात असत रे
प्रयत्नांची परकाश्टा करुन तर बघ
होशील खुप मोठा स्वतःवर विश्वास ठेउन तर बघ...!!


*----------------------------------------*

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं. गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... परक्यांपेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात एकमेकांच्या पाठीवर मग् नजरे आडून वार होतात भळभळणा-या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणच पुसायचं असतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं
असतं.... 

आपलं सुःख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे.. पण्; दुस-याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे... माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्या साठी थोडं, थोडं दुस-यासाठी जगायचं जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं.... आपल्याला कोणी आवडणं हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं आकर्षणाचं स्वप्नं ते आकर्षणंच असतं... मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं... पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं मन् आपलं वेडं असतं वेडं आपण व्हायचं नसतं.. मन मारुन जगण्यापेक्षा वेळीच त्याला आवरायचं अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच
आवरायचं असतं...!


*----------------------------------------*
 प्रत्येकाच प्रेम हे ".. Different .." असतं,कधी Deep Feeling तर कधी timepass असतं....! प्रेम आजकाल क्वचित True असतं....! आणि बरेचदा ते फक्त Game असतं....! Propose करताना आपल्यात खुप Fear असतं...!,... ... जमला तर Flower नाहीतर खेटर असत...! एकदा तरी जगावं असा हे World असतं....! Life Time टिकलं तर Heaven असतं....! आणि मध्येच बिचकल तर Hell असतं....! असाच काहीसं "Love" असतं....! आयुष्यात एकदा "Taste" कराव अस हे "Sweet Dish"असतं...!

*----------------------------------------*

भरलेला खिसा माणसाला "जग" दाखवतो ...आणि रिकामा खिसा याच जगातली "माणसं" दाखवतो...ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं, त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही. ''विचित्र आहे पण सत्य आहे''. आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते तर..... !! जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती...!! चांगले मित्र आणि औषधे हि आपल्या आयुष्यातील वेदना दुर करायचे काम करतात. फरक इतकाच कि,औषधांना एक्सपायरी डेट असते, पण मित्रांना नाही...!

*----------------------------------------*

कॉलेजच्या कट्ट्यावर बसायची मजा काही औरच असते......

४ लोकांसोबत ए.सी. रूम मध्ये काम करताना जेव्हा श्वास गुदमरतो,
पण ६ विताच्या कट्ट्यावर नवव्या मित्रासाठी पण जेव्हा भलामोठा कोपरा उरतो.... कि तेव्हा कळत रे............

चकाचक हॉटेलचा धुतलेल्या कप मधला चहा जेव्हा तसाच कपमध्ये उरतो,
पण ३ कटिंग चहा जेव्हा ६ जणांना तलब भागवायला पुरतो...कि तेव्हा कळत रे............

व्यवहारी लोकांच्या गर्दीत जेव्हा एक एक क्षण मनाला सलतो.....
पण टाळ्या देण्यात हसण्यात मस्करीत दिवस यारीचा एकच नकळत सरतो.....कि तेव्हा कळत रे............

साला जेव्हा बसची लोकलची पहावी लागते कंटाळवाणी वाट,
आणि तिची वाट पाहता पाहता “वहिनी आली रे.....” चिडवण्याचा पाठ आठवला, कि तेव्हा कळत रे.............

पैसे असताना आता आयुष्यच झालय वाटत उधार,
पण १० रुपयांची उधार मागणाऱ्या दोस्तांचा जेव्हा हवा असतो आधार, कि तेव्हा कळत रे........कॉलेजच्या कट्ट्यावर बसायची मजा काही औरच असते.....


*----------------------------------------*

खुप interesting गोष्ट आहे मित्रांनो, नक्की वाचा एक जन एकाला फोन करतो,
३ वाजता चौपाटीवर सगळ्यांनी भेटायचे ठरवतो, पण आम्ही सगळेच "भारतीय" असतो,
... ....५ वाजता अगदी न चुकता पोहचतो. जमतो सगळा मित्रमैत्रीनींचा थवा अन,
हसून,खिदळून आम्ही आसमंत हलवतो, मग कुणी तरी एक जन दगडावर चढतो,
Titanic ची पोज देऊन आकाशाकडे  बघतो,
महागडा मोबाईलचा 5 megapixel कॅमेरा बाहेर पडतो,
Facebook वरच्या अल्बम साठी जो तो हातभार लावतो, मित्र मैत्रिणींचा हात एकमेकांच्या खांद्यावर पडतो,
बिचारा तो एकजण....कॅमेरामन बनतो,
दया येऊन त्याची...कुणीतरी मग "त्याग" करतो,
कॅमेरामन फोटोत जातो अन फोटोतला दुसरा ....बिचारा बनतो. उजवीकडचा मध्ये येतो,मधला डावीकडे जातो,
लवकर लक्षात आले तर ठीक.....नाहीतर बिचारा बराच वेळ बिचाराच राहतो.
घरी जाताना ब्लुटूथ / शेअर-इट ON होते ,एक एक फोटो प्रत्तेक मोबाईल मध्ये येतो, दुसऱ्या दिवशी अल्बम आम्ही Facebook वर टांगतो,
"आम्ही चौपाटीवर गेलेलो"...हे अख्या जगाला सांगतो. पण एकत्र फिरलो,हसलो,एकमेकांशी खूप वेळ बोललो कि,आपण चांगले "मित्र-मैत्रीण" झालो...असे असते का???..नाही.
"मैत्री" कोणती?????......"मैत्री" म्हणजे ती....जी जवळ नसून पण नकळत जवळ असते. एकमेकांशी रोज बोललो नाही तरी चालेल..पण त्या मित्राची / मैत्रिणीची एखादी आनंदाची खबर ऐकल्यावर मनाच्या खोलवरून जो आनंद होतो ना....ती मैत्री. 

"पती / पत्नी" आणि "प्रियकर / प्रेयसी" या सगळ्यांपासून वेगळे.... "मैत्री" असे वेगळे नाते का म्हणून निर्माण झाले असेल????
हे जगातले एक शाश्वत सत्य वाटते.....कि....
"तुमचे तुमच्या प्रेयसीवर किंवा प्रियकरावर अथवा आईवडिलांवर कितीही खरे प्रेम असले तरी...........
आयुष्यात काही गोष्टी तुम्ही तुमच्या पत्नीला, पतीला, आईवडिलांना, प्रेयसीला, प्रियकराला नाही सांगू शकत,
पण त्याच गोष्टी "मित्राला किंवा मैत्रिणीला" सांगू शकता....आणि तेही न मागची-पुढची कसलीही तमा ना बाळगता...."
"कसा आहेस किंवा कशी आहेस?" ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी खरोखरच तिथे थांबणारी...आणि खरंच त्या उत्तरात Interested असणारी....ती खरी "मैत्री"....



*----------------------------------------*

एकदा ती बसमध्ये अचानक दिसली मित्राने ओळख करून दिली मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू? तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू? काय सांगणार आता हिला एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस" काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही हा, तर ती बस मधली मुलगी आताही माझ्याच कॉलेजात होती सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती राज की बात, मला ती आवडली होती. मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला बघता बघता दोन वर्षे अशीच सरली तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या कोमल हृदयात माझ्या, हाय! , आठवणी मात्र राहिल्या जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला तिच्या दर्शनासाठी हा मात्र पार तरसून गेला ....



*----------------------------------------* 

अमेरीकावाले बोलतात की बुलेट पृफ जॅकेटचा शोध
आम्ही ६० वर्षांपूर्वी लावला
आता ह्यांना कोण सांगणार की बुलेट पृफ जॅकेटचा शोध ३५०
वर्षापूर्वी "छत्रपती संभाजी महाराजांनी" लावलाय.
आता अजून १ ,जर आपल्या बापजादयांना विचारल संभाजी महाराज
माहीत आहे का ?
तर ते बोलतात संभाजी महाराज नाय माहीत पण संभाजी
बिडी माहीती आहे,अरे ज्या राजाला सुपारीच्या खांडाच
व्यसन नाय त्या राजाच नाव बिडीला दिलय, अरे नाव
दयायचय तर त्या अणूवस्त्रला दया ना संभाजी
मिसाईल,संभाजी अणूबॉम्ब बिडी ला काय नाव देता
आता शेवटच सांगतो,
आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणतात
की मी आपल्या महाराष्ट्राचा ईतिहास प्रत्येक विद्याथ्या
पर्यंत पोचवीन काल ईयत्ता १ ते १० च्या ईतीहासाच्या
पुस्तकाची पान चाळली "संभाजी महाराजांचा" ईतिहास ४
च्या पुस्तकामध्ये त्यांचा थोडाफार उल्लेख केला आहे व
ईयत्ता ७ च्या पुस्तकामध्ये "छत्रपती संभाजी महाराज" हा
फक्त चार पानाचा धडा आहे बस बाकी ईयत्ता १० पर्यंत
संभाजी राजांच नावही नाही, अरे ज्या राजाने १४० लढाया
केल्या ऐकही लढाई हरला नाही त्या राजाच्या ४ लढाया
जरी दाखवल्या असत्या ना तरी तुमच ईतीहासाच्या
पुस्तकाची पान भरुन गेली असती
जर स्वतःला मराठा🐅 म्हणत असाल ना तर दहा ग्रुप वर
नाही निदान दोन ग्रुप वर तरी मॅसेज शेअर करा कळू दया या
महाराष्ट्राच्या  सरकारला की "शंभू राजा" अजूनही
मराठी माणसाच्या काळजात जिवंत आहे.
१ च खंत आहे,
मराठी माणूस शांत आहे .
जय शंभूराजे 🚩🐅🚩

मी मावळा शिवरायांच्या स्वराज्याचा। ... 


*----------------------------------------*

घरटे उडते वादळात 
बिळा, वारूळात पाणी शिरते
कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
म्हणून आत्महत्या करते ?
प्रतिकुल परिस्थितीत ही
वाघ लाचारीने जगत नाही
शिकार मिळाली नाही म्हणून
कधीच अनूदान मागत नाही
घरकुला साठी मुंगी
करत नाही अर्ज
स्वतःच उभारते वारूळ
कोण देतो गृहकर्ज ?
हात नाहीत सुगरणी ला
फक्त चोच घेउन जगते
स्वतःच विणते घरटे छान
कोणतं पॅकेज मागते ?
कुणीही नाही पाठी
तरी तक्रार नाही ओठी
निवेदन घेउन चिमणी
फिरते का कोणत्या योजनेसाठी ?
घरधन्याच्या संरक्षणाला
धाऊन येतो कुत्रा
लाईफ इन्शुरन्स काढला का ?
अस विचारत नाही मित्रा
राब राब राबून बैल
कमाउन धन देतात
सांगा बरं कुणाकडून
ते निवृत्ती वेतन घेतात ?
कास्तकाराची जात आपली
आपणही हे शिकलं पाहिजे
पिंपळाच्या रोपा सारखं
पाषाणावर टिकलं पाहिजे
कोण करतो सांगा त्यांना
पुरस्काराने सन्मानित
तरीही मोर फुलवतो पिसारा
अन कोकिळ गाते मंजुळ गीत
मधमाशीची दृष्टी ठेव
फुलांची काही कमी नाही
मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
कोणतीच रोजगार हमी नाही
घाबरू नको कर्जाला
भय, चिंता फासावर टांग
जिव एवढा स्वस्त नाही
सावकाराला ठणकाऊण सांग
काळ्या आईचा लेक कधी
संकटापुढे झुकला का ?
कितीही तापला सुर्य तरी
समुद्र कधी सुकला का ?
निर्धाराच्या वाटेवर
टाक निर्भीडपणे पाय
तु फक्त विश्वास ठेव
पुन्हा सुगी देईल धरणी माय

निर्धाराने जिंकु आपण
पुन्हा यशाचा गड
आयुष्याची लढाई
फक्त हिमतीने लढ👊
फक्त हिमतीने लढ👊



*----------------------------------------*

स्वामींसमोर उभा होतो, हताश मी हात जोडून
डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून गेलो पूर्ण मोडून
मी म्हणालो,
“स्वामी, काय करू कळत नाही”
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”
स्वामी म्हणाले .. “विश्वास ठेव”
“सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे दिवे मंद आहेत” 
स्वामी  म्हणाले ... “विश्वास ठेव”
“आज असं वास्तव आहे जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही" मी म्हणालो
"कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे
तुमच्याकडे काय पुरावा ? ” शांतपणे हसत स्वामी  म्हणाले
"पक्षी उडतो आकाशात, आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर..
मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देत
विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर..
बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा, तिने सांभाळून घेण्यावर..
उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मिटतो
विश्वास असतो तेंव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर..
आज माझ्या दारी येऊन, आपली सगळी दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर..
असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात
नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल... म्हणून....
सगळे रस्ते बंद होतील तेंव्हा हा फक्त‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी..!!!

*----------------------------------------*

Share:

शब्दांची - किमया

शब्दांची - किमया (२)

------------


  एक अनोळखी मुलगा येईल,
तुझं मन नाही तुझं रूप पाहिल ,
रूपावर भाळून लग्नाला होकार देईल...
मान्य आहे तुझ्या भल्यासाठीच
तुझे घरचे हा निर्णय घेतील
पण....एका अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा,
तु माझ्याशी लग्न करशील....!
तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कूणी चालायला तर कुणी बोलायला लावणार,
आणि सगळ झाल्यावर तो,
आई बाबांकडे हुंड्याची भीक मागणार...
तुझ्या भल्यासाठी ते भीक देतीलही...
पण...एका भिकाय्राशी लग्न करण्यापेक्षा,
तु माझ्याशी लग्न करशील....!
कदाचीत तो चांगला असेलही,
पण तो तडजोड म्हणूनच होकार देईल,
तुझे घरचेही त्याच रंग रूप,
मुख्य म्हणजे पगार पाहून लग्नाला होकार देतीलही,
पण...तडजोड करणाय्रा श्रीमंता पेक्षा,
तु माझ्याशी लग्न करशील...!
तो तुला बायको म्हणून घरात ठेवेन ,
मी तुला ह्रुदयात ठेवेन..
तो तुझ्या भावना समजण्याचा प्रयत्न करेन,
मी तुझ्या भावनांशी नातं जोडेन...
माझ्या शब्दांवर आज तु हसशील..
पण... खरच ,एका अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा,
तु माझ्याशी लग्न करशील...!!


*----------------------------------------*

गर्लफ्रेन्ड नसल्याचा अभीमान अहो ऐकलं का ? आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!
आमच्या बाईकच्या मागच्या सीटवर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा, तर कधी एखादी माशीच बसते
आणि बाईक पूसण्याचे आम्ही कधीच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

सिनेमा बघायला आम्ही गॅंगमधे जातो मस्त एक बास्केट पोपकोर्न तासभर खातो
आणि बुड्ढीका बालचा चिक्कट वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण, आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

वीकएंड्ला आऊटींग करतो, फ़क्त मित्रांबरोबरच घालवतो
काही नाही तर मस्त झोपा काढतो
आणि रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण, कारण आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

आमचे मोबाईलचे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्त घरी कींवा मीत्रांना असतात,
आणि आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण, आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

मित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दूसर्र्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...! अहो ऐकलं का आम्हाला गर्लफ्रेन्ड नाही...!

हा हा हा हा हा हा हा !!!!!!!




 
*----------------------------------------*

आता पुन्हा पाऊस येणार....
आता पुन्हा पाऊस येणार , मग आकाष काळ नीळ होणार,
मग मातीला गंध फुटणार ,मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार, काय रे देवा.....
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,मग लपवुनही ती कुणाला तरी कळावस वाटणार,
मग ते कोणितरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार , नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतच कळल तर बर, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार..काय रे देवा.....
मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार, मग त्यात एखाद जुन गाण लागलेल असणार्,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार्,मग साहिल ते नी लिहिलेल असणार्,
मग ते लतानी गायलेल असणार्...,
मग तूही नेमक आत्ता हेच गाण ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार्,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मगना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार्....काय रे देवा.....
मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार्.., मग त्याला आकाशाची आसवं लगडणार्..,मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार्....,मग पाच फूट पाच इंच देहअपूरा अपूरा वाटणार , मग ऊरी फुटुन जावसं वाटणार, छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावासा वाटणार्...,मग सारं कसं मूर्खासारखं उत्कटं उत्कटं होत जाणार्,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार् ,काय रे देवा.....
पाउस पडणार्.. मग हवा हिरवी होणार..मग पाना पानात हिरवा दाटणार्,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शीरू पहाणार,पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खर काय ते कळणार्, मग ते ओशाळणार्,
मग पून्हा शरीराशी परत येणार, सर्दी होउ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार, चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधंणार्,
एस. डी. चं गाणही तोपर्यंत संपलेलं असणार्,रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार्, कपातल वादळं गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार.....
काय रे देवा.....पाउस गेल्यावर्शी पडला,पाउस यंदाही पडतो.. पाउस पूढच्या वर्शीही पडणार्....काय रे देवा...


*----------------------------------------*

प्रेम माझं तुझ्यावर खरचं खुप प्रेम आहे
म्हणूनच तुझ्या सगळयाच गोष्टीवर मी फ़िदा आहे
तु जेव्हा माझ्या बाईकवर बसशील स्कार्फ़ तू लपेटून घे
नसशील सुंदर तरी चालेल पण पर्स तुझी भरुन घे मी जेव्हा फ़ोन करीन धावत-धावत भेटायला ये
होत असेल गरम तरीसुध्दा माझ्याबरोबर टपरीवरचा फ़क्कड चहाच घे
वाढदिवस तुझा असेल तेव्हा माझा गुलाब प्रेमाने घे फ़ुलामध्येच हिरे मोती सगळं काही तू पाहून घे
असेच प्रेम करु जन्मभर ...पण असेल तुझा लग्नाचा विचार तर खिसा माझा
पाहून नोकरी तू शोधून घे यामध्ये तुला जे समजायचे ते समजून घे
पण माझ तुझ्यावर खरचं खूप प्रेम आहे म्हणून तुझ्या सगळ्याच गोष्टीवर मी फ़िदा आहे.
 

 
*----------------------------------------*

ती त्याला नेहमी ओरडते ...
"का रे तू अस करतोस...?
मी रोज खूप बोलते, अन तू नुसताच शांत असतोस .....♥
मी तुझी काळजी करते, अन तू हि माझी काळजी करतोस.....♥
काहीही झालं मला, तर पूर्ण जग डोक्यावर घेतोस.....♥
मी रोज तुझी वाट बघते, अन तू रोज उशिरायेतोस......♥
office असो, कि रात्री online,तू नेहमीच का अस करतोस?.... ♥
का कळत नाही तुला माझ्या वागण्याचा अर्थ,
कि कळून हि न कळल्या सारखा करतोस....? ♥
मनातल्या भावनांना माझ्या,
का समजून हि नसमजल्या सारखा करतोस.....?♥

का करतोस रे अस तू....?
माझा असून हि का नाहीस रे माझा तू.....?"हे बोलून तिझे डोळे पाणावतात,
आणि तो तिझे डोळे पुसतो,तिला पाहून हळूच हसतो.....♥
अन तिला जवळ घेत घेत बोलतो,
"शब्दात सगळ कस सांगू ग तुला,मनात आहे खूप काही.....♥
वागण्यातून सांगतो जे ,तुला ते कळत नाही... ♥

चल शब्दात न सांगितलेलं,
आज मी तुला सांगतो,मनातला गुपित माझ्या ,
आज तुझ्या पुढे मांडतो,कळत नकळतच जुळल,
नात आपल्या प्रेमाच , आज मी हे मानतो..
अन तुझ्यावर खरच ग खूप प्रेम करतो मी... !!!


 *----------------------------------------*

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा
हसत हसत तू काबुल कर
तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा
ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!
झोपलं आहे तुझं जे भाग्य
डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर
हेवा असेल प्रत्येक मनी तुझा
शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!
जर दिलासा शब्द तू कुणाला
त्या शब्दांचा तू आदर कर
शास्त्रशास्त्र पारंगत असलास जरी तू
तुझ्या अमोघ शब्दांनीच शत्रूला तूपराजित कर !!!!!
असेल जीवन तुझे वादळ वाऱ्यापरी
असेल जीवनी तुझ्या दु:ख आभाळाएवढं
असेल आयुष्य तुझं सदा संघर्षमय
जीवन इतरांचं मात्र प्रकाशित कर !!!!!! 
 


 *----------------------------------------*


 
Share:

Popular Posts

© Akshaykumar Divate. Powered by Blogger.

Search This Blog

Wikipedia

Search results

Translate

Contact Form

Name

Email *

Message *

Popular Posts

Recent Posts

Unordered List

  • Lorem ipsum dolor sit amet, consectetuer adipiscing elit.
  • Aliquam tincidunt mauris eu risus.
  • Vestibulum auctor dapibus neque.

Sample Text

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Pages

Theme Support

Need our help to upload or customize this blogger template? Contact me with details about the theme customization you need.